Home Breaking News अवकाळी पावसाची भरपाई थकलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर तहसिलदार विकास बिक्कड यांचा भर

अवकाळी पावसाची भरपाई थकलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर तहसिलदार विकास बिक्कड यांचा भर

116
0

गिरीश आंदे (तालुका प्रतिनिधी कळमेश्वर)
कळमेश्वर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आले आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही.
तहसिलदार विकास बिक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा शेतकऱ्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी (शेतकरी आयडी) प्रणालीमध्ये अद्ययावत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित ग्राम महसुल अधिकारी, ग्राम सेवक किंवा कृषी सहायक यांच्याकडे तात्काळ जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
📑 आवश्यक कागदपत्रे:
1️⃣ आधार कार्ड
2️⃣ फार्मर आयडी (शेतकरी आयडी)
3️⃣ जमीन संयुक्त नावे असल्यास इतर सह-हिस्सेदारांचे संमती पत्र
4️⃣ बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, अनुदानाची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तातडीने सादर करून अनुदान मिळविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार विकास बिक्कड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here