Home Breaking News कळमेश्वर येथे उड्डाणपूल (R.O.B.) आणि गोंडखैरी फाटा रस्ता प्रकल्पाचे भूमिपूजन नितीन गडकरी...

कळमेश्वर येथे उड्डाणपूल (R.O.B.) आणि गोंडखैरी फाटा रस्ता प्रकल्पाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न

96
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर परिसरातील वाहतुकीला नवा वेग देणारा आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा उड्डाणपूल (R.O.B.) आणि गोंडखैरी फाटा रस्ता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा आज, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
या वेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य मंत्री मा. आशिष जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाला आमदार आशिष देशमुख, आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक मानकर, सुधीर पारवे, दिनेश ठाकरे, अशोक धोटे, रामराव मोवाडे, अरविंद गजभिये, धनराज देवके, प्रकाश वरुळकर, किशोर रेवतकर, आदर्श पटले, मीना तायवाडे, रोहित मुसळे, उज्वला बोढारे, स्मृती ईखार, प्रगती मंडळ, प्रतीक कोल्हे, विलास महल्ले, महादेव ईखार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक सुलभ, सुरक्षित आणि सुगम होणार आहे. तसेच या विकासकामामुळे कळमेश्वर आणि गोंडखैरी परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here