गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक ६ जुलै २०२५ रोजी तेलकामठी गावातील परिसरामध्ये तालुका वकील संघ कळमेश्वर तालुका विधी सेवा समिती कळमेश्वर तथा वनविभाग कळमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ११,१११ रोपट्यांची लागवड करून वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक माननीय श्री दिनेश पी.सुराणा साहेब (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागपूर)हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावण्यास सांगितले व वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री प्रवीण एम.उन्हाळे साहेब( न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा समिती नागपूर) तसेच विशेष अतिथी माननीय श्री संजीव सरदार साहेब( न्यायाधीश दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सावनेर )हे होते. या प्रसंगी माननीय श्री रवींद्र राठोड साहेब (न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती कळमेश्वर) यांनी वृक्ष व आपले जीवन यावर मार्गदर्शन केले .
यावेळी श्री नितीन तेलगोटे (जिल्हा सरकारी अभियोक्ता नागपूर) सौ सरिता ताराम(सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता नागपूर) सौरभ बी.मांडवे साहेब(सह न्यायाधीश कळमेश्वर ) ॲड. हेमंत ताजणे(अध्यक्ष तालुका वकील संघ कळमेश्वर), ॲड. निलेश अंजनकर (सचिव तालुका वकील संघ कळमेश्वर,) ॲड. आकाश काळे(सरकारी अभियोक्ता कळमेश्वर) ॲड .निलेश गजभिये व ॲड.विद्या शेवाळे(उपाध्यक्ष ता.व.स. कळमेश्वर) ॲड.पल्लवी सोनवणे(सरकारी अभियोक्ता कळमेश्वर) ॲड.शैलेश जैन (अध्यक्ष तालुका वकील संघ सावनेर) श्री प्रवीण शिरपूरकर ( क्षेत्र वनाधिकारी कळमेश्वर)धुमाळ साहेब तसेच श्री अनिलजी मस्के साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर) श्री विकास बिक्कड साहेब(तहसीलदार कळमेश्वर) अंशुजा गराटे (गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर)उपस्थित होते .
तसेच वनविभागाचे सर्व कर्मचारी व अधिकारी सुद्धा उपस्थित होते याप्रसंगी विनोबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री ज्ञानेश्वर मा.निघोट साहेब उपस्थित होते यांनी शाळेतर्फे सर्व मान्यवरांचा रोपटे देऊन सन्मान केला. यावेळी गावच्या सरपंच प्रेमाताई सुरेश डफरे तसेच उपसरपंच श्री उमरावजी भुजाडे व इतर ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तेलकामठी येथील सर्व विद्यार्थी प्राचार्य व शिक्षक वर्ग उपस्थित होते. अशा प्रकारे झाडे जगवा व जीवन वाचवा असा संकल्प घेऊन हा कार्यक्रम पार पडला.




