Home Breaking News श्रीक्षेत्र धापेवाडा येथे सात दिवसीय यात्रा महोत्सवाला प्रारंभ

श्रीक्षेत्र धापेवाडा येथे सात दिवसीय यात्रा महोत्सवाला प्रारंभ

84
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथे रविवार दिनांक ६ जुलै २०२५ आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.तर जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल हा जयघोष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी केला.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक सोहळा व महापूजा मंदिराची पुजारी मिलिंद महाराज वेडेकर यांच्या उपस्थितीत चंद्रशेखर गिरी व प्रभाकर डहाके यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आली होते. आषाढी एकादशी यंदा रविवार असल्याने जिल्ह्याभऱ्यातील जवळपास ३० हजार भाविकांची संख्या दर्शन घेण्यासाठी रांगेत दिसली.
यावेळी देवस्थान समितीचे उपाध्यक्ष भानुप्रताप सिंह पवार, सचिव आदित्य प्रताप सिंह पवार, सरपंच मंगला शेटे, उपसरपंच मंगेश माले, माजी सरपंच मनोहर काळे, माजी उपसरपंच राजेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
टाळ-मृदंगाच्या गजरात भजन, कीर्तनांचे आयोजन करण्यात आले लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे विठू माऊली चे दर्शन घेतले. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची, अल्पोआहाराची व महाप्रसादाची व्यवस्था स्वयंसेवी संस्थांनी केली होती. यात्रेदरम्यान उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार विकास विक्कड, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, मंडळ अधिकारी शरद बोरकर यांनी भेट दिली.
धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोग्यसेवक व सेविका भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत होते. तसेच सहायक पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात सावनेरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील पाटील आणि कळमेश्वरचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.भाविकांना शिस्तबद्ध दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीच्या स्वयंसेवकांनी मोलाची योगदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here