सावनेर
येथील अवधूतवाडी अरविंद सहकारी बँकचा बाजूला देवश्री सेल्स नावाने असलेल्या दुकानात ७ जूनला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने १५ लाखाचे साहित्य जाळून खाक झाल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत गिरी राहणार चिंचपुरा सावनेर याचे देवश्री सेल्स नावाचे दुकान नेहमी प्रमाणे ६ जूनला रात्री १० वाजता दुकान बंद करून घरी गेले.
मध्यरात्री सुमारे २ वाजता सुमारास दुकान लगत असलेल्या घर मालकाचा प्रशांत गिरी याला फोन आला की तुमचा दुकानातून धुर निघत असून काहीतरी जळल्याचे भाकीत होत आहे. त्वरित दुकानाची चाबी घेऊन गिरी दुकानात गेले असता आगीने रौद्र रूप घेतलेले दिसलें.
माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते निलेश पटे यांनी तत्काळ नप येथील अग्निशामक दलाला बोलावले त्यामुळे आग लवकर नियंत्रणात आली. परंतु दुकानातील संपूर्ण साहित्य जाळून राख झाले. सुदैवाने बाजूचा दुकानाला आगीचे लपटे गेले नसल्याने मोठा अनर्थ टळला. दुकान मालक प्रशांत गिरी यांचाही सव्वाद केला असता ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शंका त्यांनी व्यक्त केली. परंतु झालेले हे नुकसान माझा करिता फार मोठा धक्का आहे.यातून सावरायला शून्यातून पुन्हा समोर यावे लागेल आणि हे तितके सहज नसल्याचे मत यावेळी प्रशांत गिरी यांनी व्यक्त केले.




