गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
नागपूर जिल्ह्यातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.परसोडी वकील, मडासावंगी, पाणऊबाळी, धापेवाडा, सालाई नांदा,तेलकामठी,तिडंगी, तेलगाव व तिष्टी खुर्द अशा गावांमधील शेतजमिनींवरील पिके पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
संत्राबागा, कपास, सोयाबीन, ऊस व इतर हंगामी पिके पूर्णपणे पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकरी बांधवांनी केलेल्या पाहणीत शासन यंत्रणेसमोर अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. विशेष म्हणजे इ-पिक प्रणालीत गंभीर अडचणी निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस उरलेले असतानाही प्रणाली कार्यरत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात तातडीने पुढील मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे
•संबंधित सर्व गावांतील शेती नुकसानीचा पंचनामा त्वरित करून अहवाल सादर करावा.
•प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला किमान ५०,००० रुपये तातडीची मदत/नुकसान भरपाई वितरित करावी.
•इ-पिक प्रणाली तातडीने कार्यान्वित करून शेतकऱ्यांना अर्ज भरण्याची सोय सुलभ करावी.
मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर विधानसभा बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.या आंदोलनात विधानसभा संगठक विनोद जिवतोडे,उपजिल्हा प्रमुख मधुकर दळवी, जिल्हासह प्रसिद्ध प्रमुख मंगेश गमे, युवासेना संगठक रुक्षित भौतकर, कळमेश्वर तालुका प्रमुख बाळू पाटील जाचक, सावनेर तालुका प्रमुख मनोज कुहीटे,सावनेर उपतालुका प्रमुख – गेदालाल कामाले,कळमेश्वर शहर प्रमुख – राजू बोरकर,कळमेश्वर उपशहर प्रमुख – विलास बारमाशे,सावनेर शहर प्रमुख – राम घाटोडे,सुरज पाटील,मयूर उईके,अनिल आचारी,अशोक शिरपूरकर,सुधाकर वाघ,बाबा गौतमारे,सुरेंद्र पलेरिया,गणेश तवले,इम्रान पठान तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल,अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
Home Breaking News उ.बा.ठा.(शिवसेना) पक्षाची शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाली नाही तर सावनेर विधानसभा बंद आंदोलनाची...




