Home Breaking News राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव उत्साहात साजरा । माजी मंत्री सुनील...

राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव उत्साहात साजरा । माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण

127
0

सावनेर
अहिल्यादेवी होळकर (१७२५-१७९५) या मध्य भारतातील मालवा (इंदौर) येथील होळकर घराण्याच्या प्रमुख शासक होत्या , ज्या मराठा राज्याचा भाग होत्या . त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या सत्तेवर आल्या आणि १७६७ ते १७९५ पर्यंत राज्य करणाऱ्या शासक बनल्या . त्यांच्या अपवादात्मक शासन, सामाजिक कल्याण ,संस्कृती आणि अध्यात्मातील योगदानासाठी ओळखल्या जाते . सावनेर तालुक्यातील टेंभूरडोह येथे दिनांक 2 जुन 2025 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्य आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी कँबीनेट मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार यांनी आजच्या शासनप्रणालीत अहिल्यादेवी होळकर यांचा फक्त नाम मात्र उल्लेक्ख करून आयोजनातून फक्त शासकीय योजनांचा गवगवा करण्यात सत्ताधारी मदमस्त आहे . यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारातील लोकराज्य घडवावे असे सुनील केदार यांनी प्रतिपादित केले .
यावेळी बुध्दिपीठावर संविधान संस्कार वर्गाचे निळकंठराव यावलकर , भारतीय परिवर्तनवादी संघाचे संयोजक मयूर नागदवणे , सकल धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष बाबा टेकाडे , प्रा. सावे , प्रकाश लांजेवार , अरुण चिखले ,यादवराव ठाकरे , सुधीर चौधरी , ग्राम पंचायत अधिकारी शामराव डांबरे , योगेश ठाकरे , सरपंच दीपक सहारे प्रेमचंद मडके , गजानन सव्वालाखे , विनायकराव सव्वालाखे , आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी मूर्तिदाता नितीन तयवाडे , जागा दानदाता लक्ष्मी कंकलवर यांचा सत्कार करण्यात आला . कार्यंक्रमाचे आयोजन सकल धनगर समाज समितीचे अध्यक्ष माजी सरपंच विनोद नस्कोल , मोरेश्वर चवणारे , विलास नस्कोल , विनायक कंकलवार , बल्लू म्याक्लोर , दशरथ नस्कोल , मुकिंदा गोटफोडे , यादव कडरेल व इतर समाजबांधव व सहकाऱ्यानी विशेष कार्य केले. आशिष बागडे यांनी संचालन केले तर प्रेमचंद मडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here