नागपूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत च्या बैठकीत परंपरागत त्याच त्या विषयावर चर्चा न करता नवनवीन विषयावर विचारमंथन व्हायला पाहिजे असल्याचे मत अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी व्यक्त केले. तर जिल्हा स्तरावर काय काम केलेत, आणि येणाऱ्या दिवसांत काय काम करणार असल्याची विचारणा अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय सहसचिव जयंतभाई कथेरीया यांनी केली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताची बैठक प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय सहसचिव जयंतभाई कथेरीया यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा येथील महादेवपुरा स्थित महादेव मंदिरात दि. २० मार्च रोजी तीन सत्रात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ. अजय गाडे, प्रांत सचिव नितीन काकडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सतीश देशमुख, जिल्हा संघटनमंत्री किशोर मुटे, जिल्हा सचिव विनोद पोटे, प्रांत पदाधिकारी तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती व चंद्रपूर येथील जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी दिपप्रज्वलन करून व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रांत सचिव नितीन काकडे यांनी मागील बैठकीचे अहवाल वाचून दाखविले. व जिल्हा पदाधिकारी कडून जिल्हा निहाय लेखी अहवाल मागवून आगामी नियोजनाची माहिती घेतली.
त्याचप्रमाणें सहा विषय प्रकोष्टाबाबत मागील वर्षात घेतलेले कार्यक्रम व भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा, जिल्हा अभ्यास वर्ग बाबतीत चर्चा, युवक व महिलांचा सहभाग वाढविण्यासंदर्भात तसेच संघटनविस्तार याबाबत चर्चा करून सुचना मागविण्यात आले, माहे एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या तीन महिन्याचे विशेष नियोजन. (प्रत्येक जिल्हा व तालुक्याने ग्राहकांच्या आरोग्य व फसवणुक संबंधांनी तीन विषय घेवून जिल्ह्या व तालुक्यातील प्रशासकिय अधिकारी व्यापारी संघटना यांच्या सोबत बैठकी घेवून निवेदने देण्याचे ठरले आहे. राष्ट्रीय सहसचिव जयंतभाई कथेरीया यांचे उद्बोधननाने कार्यक्रमाची सांगता झाली.