गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 21 मार्च 2025 रोजी “इंडिया लाईव्ह तेज न्युज”मध्ये काल “नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार” या मथळ्याखाली न्यूज लावण्यात आली होती.
त्यानुसार कळमेश्वर तालुक्यातील गट ग्रामपंचायत नांदीखेडा (तिष्टी खु) गावामध्ये कित्येक दिवसांपासून पाणी टंचाई सुरू असून उन्हाळ्याला नुकतीच आताच्या सुरुवात झाली आहे.परंतु ग्रामपंचायतच्या विकास कामाच्या ठरावांमध्ये अजून पर्यंत पाणीटंचाई विषयी चर्चा करण्यात आलेली नाही. तसेच याविषयी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत चर्चा करून विकासाचा आराखडा सरपंच व ग्रामसेवक धोटे यांनी करून घेणे गरजेचे होते पण त्यांनी गावाची पाणीटंचाईची समस्या जशीच्या तशी ठेवली आहे.तर आता वेळेवर पाणीटंचाईसाठी उपाय शोधत गावालगतील शेतकरी विठोबा बनसुले यांच्या शेतातील बोर अधिग्रहण करून पाणी घेतले आहे परंतु त्या बोर मधील पाणी आधी शेतकरी ओलतो व ओलीतकेल्यानंतर फक्त १ तास गावातील पाणीपुरवठा करता पाणी देतो परंतु त्यांनी पाण्याची टाकी सुद्धा भरत नाही तर गावातील नागरिकांना पाणी पिण्याला सुद्धा मिळत नाही. करिता आज दिनांक.२१मार्च२०२५ रोजी पंचायत समिती कळमेश्वर येथील गटविकास अधिकरी व ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक धोटे यांना निवेदन देऊन पाणी टंचाईवर तात्काळ निराकारण करण्यासाठी 15वा वित्त आयोगाच्या निधीतून पानी टंचाईच्या कामासाठी प्रस्ताव मंजुर करुन निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नांदिखेडा (तिष्टी खु.)गट ग्रामपंचायत सदस्य मनोज मांडवगडे,चक्कधर जीवतोडे,सौ.दुर्गाताई प्रेमराज नेहारे यांचेकडून करण्यात आली होती.
यावर गावचे सरपंच यांच्या कडून पाणीटंचाई समस्येविषयी मत आज घेतले असता त्यांनी सांगितले की,”गावाच्या विकास आराखडा तयार करते वेळेस मी गावात दवंडी देऊन पाण्याच्या पाणीटंचाई विषयी चर्चा केली आहे.त्या पाणीटंचाई विषयी बैठकीबाबत तक्रार करणाऱ्या सदस्यांना सुद्धा माहिती आहे. तरी त्यासंदर्भात माझ्याकडे असलेले ठरावाची प्रत ग्रामसेवक यांच्याकडून घेऊन मी तुम्हाला पाठवतो.तसेच आज किंवा उद्या पासून ग्रामपंचायत मार्फत बोरचे काम गावात सुरू करत आहे.”- देवेंद्र बोढे (सरपंच गट ग्रामपंचायत नांदीखेडा तिष्टी खु.)
तर आज पाणीटंचाई विषयी ग्रामसेवक यांच्या कडून सुद्धा मत घेण्यात आले त्यांनी सांगितले की,” गट ग्रामपंचायत नांदीखेडा तिष्टी खु.येथील पाणीटंचाई विषयावर सरपंचाचे मत घ्या ? मी आता कशाला मत देऊ ?”
– प्रकाश धोटे (ग्रामसेवक गट ग्रामपंचायत नांदीखेडा तिष्टी खु.)
तर अशा प्रकारचे अनेक मूलभूत समस्या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वारंवार समोर येऊ नये या संदर्भात कोणकोणती ठोस पावले उचलून कोणती कारवाई पंचायत समिती कळमेश्वर येथील गटविकास अधिकारी अंशुजा गराटे करतात यासाठी नेहमीप्रमाणे कळमेश्वर तालुक्यातील नागरिक प्रतीक्षेत आहेत ?



