Home Breaking News 17 जूनला खापा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी विशेष बैठकीचे आयोजन – आमदार...

17 जूनला खापा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी विशेष बैठकीचे आयोजन – आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचा पुढाकार

88
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सर्व नगर परिषद व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी उपाययोजनेसंदर्भात 17 जूनला एका विशेष बैठकीचे आयोजन करावे, या विषयाला अनुसरून आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्याशी 12 जूनला चर्चा करून त्यांना यासंबंधी एक निवेदन दिले.
नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या हेतूने शिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांचा शारिरिक, बौध्दिक व खेळाडुवृत्ती विकास, मध्यान्ह भोजनाचा दर्जा, प्रत्येक विद्यार्थ्यांना अत्युच्च गणवेश, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाचे समुपदेशन, सीबीएसई पॅटर्न राबविणे, राष्ट्रीय शिक्षण नितीमुळे होणारे बदल व इतर विषयांकित उद्देशाने आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी हे निवेदन दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, मुख्याधिकारी नगर परिषद, सावनेर/खापा/कळमेश्वर/मोहपा, शिक्षणाधिकारी नगर परिषद सावनेर /खापा/कळमेश्वर/ मोहपा, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सावनेर/कळमेश्वर परिषद, शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सावनेर / कळमेश्वर यांनी या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित रहावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
या बैठकीबाबत तातडीने पावले उचलत जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी निर्देश दिले आहेत. मंगळवार, दिनांक 17 जून 2025 रोजी दु. 3.00 वा. नगर परिषद, खापा, ता. सावनेर येथे या बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व संबंधितांना 13 जूनला पाठविण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही मागे राहू नये, यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here