Home Breaking News नगर पालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

नगर पालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

69
0

सावनेर ता. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर पालिकेच्या वतीने शहरात मुख्याधिकारी किरण बगडे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व हरित शपथ घेण्यात आली.
 शहरातील गायकी ले-आउट परिसर,महाजन ले-आउट परिसर,माळेकर ले-आउट,घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्र परिसरात पर्यावरणाचा संदेश देऊन वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात शहरातील नागरिक,नगर परिषद अधिकारी,कर्मचारी,सफाई कामगार,घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रातील कामगार सहभागी होऊन त्यांनी उत्साहाने वृक्षारोपण केले. 
पर्यावरण संवर्धनात चालना देणे आणि महिलांच्या सहभागातून हरीत चळवळीला बळकटी देणे या उद्देशातून जनजागृती करण्यात आली असून शहरात महिलांचा सहभाग वाढेल अशी अपेक्षाही पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली  
याप्रसंगी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी कले, निकोसे,मोरे,पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता  कोलते, विद्युत अभियंता भोयर,लेखापाल खंडागळे,लेखापरीक्षक पाटील प्रशासन अधिकारी पटले,स्वच्छता निरीक्षक धिरज देशमुख,अग्नीशमन अधिकारी वाडेकर, शहर समन्वयक वाटकर,अभियंता अवचट तसेच न.प.कर्मचारी रोषण धोटे, मेंढे,जांभूळकर,लोही,बोबडे,वानखेडे, समुद्रे, मतेल, वाघमारे, लीडर,विनयकुमार,आकाश, बागडे, महाजन,पाठक,हजारे,दृरुगवार,ई.कार्यालयीन कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here