सावनेर तालुक्यातील खुबाळा,बोरुजवाडा,नांदागोमुख, चिंचोली आणि पाटणसावंगी या पाच ग्रामपंचायती मधील प्रतिनिधींना जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण नुकतेच सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणाचा उद्देश ग्रामपंचायत मध्ये जलस्त्रोत बळकटीकरण आणि जलसुरक्षतेच्या उपायोजनांबाबत जागरूकता वाढविणे होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद व सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा.यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.
प्रशिक्षणात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर,सहाय्यक गटविकास अधिकारी ज्योती जातगडे,आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी नरेंद्र बागडकर,कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेश राऊत,प्रशिक्षक राजु आनंद पवार,अम्रपाली गजभिये,हरिदास रानडे रुपाली हिवशे,अंकुश बुरांगे,सुनील गजभिये,नलिनी शेरकुरे, दिलीप दिवटे,समन्वयक स्वप्नील जनबंधू,प्रदीप बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षकांनी पावसाचे पाणी साठवण्याच्या विविध पद्धती नदी- नाले,पुनर्भरण तंत्र आणि जलसुरक्षतेच्या उपायोजनांवर सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात सरपंच,सचिव,अनुसूचित जाती व जमातीच्या महिला,जलसुरक्षक व इतर प्रतिनिधी उपस्थित झाले होते.




