Home अंधश्रद्धा जनजागृती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर तर्फे नांदा गोमुख येथे चमत्कार सादरीकरणाचे...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सावनेर तर्फे नांदा गोमुख येथे चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम संपन्न

69
0

दिनांक 4 एप्रिल 2025 ला सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख येथे चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक महादेव खरवडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सेवकराम राऊत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे मंच पिठावर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक महादेव खरवडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा पसरू नये असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सेवकराम राऊत यांनी समाजामध्ये वेगवेगळी अंधश्रद्धा आहे ती कशी दूर करता येईल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना समाजातील रूढी परंपरा बद्दल वेगवेगळे उदाहरण देऊन त्यांच्याच भाषेत मजेदारपणे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सावनेर चे कार्याध्यक्ष मनीषा साखरे यांनी केले तर आभार हे राजेंद्र चव्हरे सर यांनी केले.
कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव नरेंद्र पाटील, सतीश चिमलवार, ओम प्रकाश मोहाडे,धनवंती बोंडे,अनंता देरकर, तुषार धोटे,वैशाली ताजणे, प्रिया मोहाडे, संगीता सोमकुवर, राजू परतेती, अमोल महाजन, चंदा टुले, दिनेश्वरी कोराम,पुष्पांजली मोहाडे इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here