सावनेर येथील डाॅ.हरिभाऊ आदमने महाविद्यालयात नुकताच बी.ए.व बी.काॅम अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील बी.ए.व बी.काॅम.प्रथम तथा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे संरक्षक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वीरेंद्र जुमडे यांच्या मार्गदर्शनात सदरहू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागप्रमुख डाॅ.वंदना बावनकुळे उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभागप्रमुख डाॅ.अरवींद पुनवटकर, कार्यक्रमाचे आयोजक इंग्रजी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डाॅ.प्रगटसिंघ बावरा,सांस्कृतिक स्पर्धा परीक्षक मराठी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डाॅ.प्रमोद लेंडे,क्रीडा संचालक डाॅ.दिनेशकुमार किमटा, वाणिज्य विभागप्रमुख डाॅ.प्रशांत पाटील मंचावर उपस्थित होते.
विद्यार्थी जीवन हे फुलपाखरासारख असते.या जीवनात मनसोक्त बागडायच असते.त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत भविष्यातील रोजगारासाठी नवनवीन कौशल्ये हस्तगत करणे महत्त्वाचे ठरणारे आहे.पदवीच्या शिक्षणातूनच तुम्हाला पदव्युत्तर शिक्षणाकडे वळताना स्वतःतील कौशल्याचा कस लावणे गरजेचे आहे.असे विचार अतिथी भाषणातून डाॅ.अरविंद पुनवटकर यांनी मांडले.
निरोप ही स्वतला गंभीर करणारी घटना आहे.पदवी महाविद्यालयाच्या शैक्षणिक अनुभवातूनच तुम्हाला तुमच्या जीवनाची कास धरावी लागणार आहे.महाविद्यालयाचे शिक्षक नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करतील पण काळाची पाऊले ओळखून वागणे ही स्वतःची जबाबदारी आहे.असे विचार डाॅ.वंदना बावनकुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले.
यावेळी सांस्कृतिक विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. साजना बल्की,वेदांती गुडधे,प्रतीक बानाईत,पिंटू सातपुते.रंजना बनारसे,बादल डोईफोडे,राम राऊत,तुषार सावध,मयुरी खांडेकर यांचा समावेश होता.क्रीडा स्पर्धेतील राज्यपातळीवर योगदान देणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी अंजली कोकड्डे,अश्विनी खांडेकर,धुर्वे,धोटे यांचाही गौरव करण्यात आला.
इंग्रजी विभागाच्यावतीने आयोजित ३० दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमात डाॅ.मिलिंद साठे,डाॅ.सचीन वैद्य,डाॅ.अर्चना पाटील,डाॅ.विकास सावंत,मयुराणी खांडेकर,सुशील बोकडे,नरेंद्र रामटेके,अनंत उईके,राजेश वाघमारे,प्रकाश घ्यार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सभागृहात महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




