Home Breaking News अजगरास निर्दयपणे मारहाण करणाऱ्या इसमास अटक — खापा वन विभागाची तात्काळ कारवाई

अजगरास निर्दयपणे मारहाण करणाऱ्या इसमास अटक — खापा वन विभागाची तात्काळ कारवाई

77
0

मानेगाव (ता. सावनेर,जि. नागपूर) येथे एका इसमाने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत अजगरास अतिशय निर्दयपणे मारहाण केल्याची घटना घडली. या अमानुष कृत्याची माहिती मिळताच सावनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करत वन विभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली.
सदर प्रकरणी खापा वन विभागाने तत्परतेने पहिली कारवाई केली असून,अजगरास निर्दयपणे मारहाण करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही अटक वनपरीक्षेत्र अधिकारी विजय गंगावने, क्षेत्रसहाय्यक यु.पी.बावने आणि वनरक्षक गोविंद मेंढे यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.पुढील तपास खापा वन विभागाकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here