Home Breaking News पावसाचा तडाखा : तेलकामठी मंडळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पावसाचा तडाखा : तेलकामठी मंडळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

148
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी महसूल मंडळात पुन्हा एकदा निसर्गाचा कहर ओसंडून वाहिला. दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारच्या ४ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांनी शेतपिके उध्वस्त केली. विशेषतः कपाशीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून लावणीच्या उंबरठ्यावर असलेली झाडे आडवी पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
• कपाशीच्या उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्यता.
• सोयाबीन, तूर आणि इतर हंगामी पिकांनाही हानी.
• अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी आर्थिक संकटात.
• शेतकऱ्यांची शासनाकडे तात्काळ पंचनामा व सरसकट नुकसानभरपाईची मागणी.
• मदत विलंबल्यास उपजीविकेची भीषण समस्या निर्माण होण्याचा इशारा.
दरम्यान, नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करतील,अशी चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here