गिरीश आंदे
कळमेश्वर पंचायत समितीतील सहाय्यक गट विकास अधिकारी प्रगती जगताप मॅडम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कळमेश्वर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रगती जगताप यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. पूर्व परीक्षेच्या काळात वडिलांचे दुःखद निधन झाले असतानाही त्यांनी खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अभ्यास सुरू ठेवला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश मिळवले आहे.याआधी त्यांनी कृषी सहाय्यक म्हणून काम करत असताना देखील स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली होती. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी सहाय्यक आयुक्त (SDM दर्जाचे पद) मिळवून आपले स्वप्न साकार केले.त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला असून, कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
Home सामाजिक कळमेश्वर पंचायत समितीतील सहाय्यक गट विकास अधिकारी प्रगती जगताप यांचा ऐतिहासिक पराक्रम...




