सावनेर, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) — भारताचे मुख्य न्यायाधीश मा. बी. आर. गवई यांच्या संदर्भात नुकत्याच घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सावनेर बार असोसिएशनतर्फे दि. ७ ऑक्टोबर ला निषेध सभा घेण्यात आली.
या सभेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. आर. आर. ठावरे यांनी भूषविले. सभेमध्ये अॅड. पांडे, अॅड. विनोद कऊटकर तसेच तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शैलेश जैन यांनी आपले विचार व्यक्त केले. वक्त्यांनी सदर घटनेची तीव्र शब्दांत निंदा करून न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली.
सभेच्या अखेरीस सर्व सदस्यांच्या एकमताने ठराव पारित करून दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार सन्माननीय न्यायालयाला कळवून,न्यायालयीन कामकाजात वकिलांनी सहभाग घेतला नाही,व बंद पाळण्यात आला. तालुका वकील संघाच्या सभासदांनी नारेबाजी करून रोष व्यक्त केला. बंद यशस्वी करण्याकरिता एड. ठावरे, एड.पांडे एड.गायधने एड.बाणाइत, एडवोकेट शर्मा तालुका बार चे अध्यक्ष ॲड शैलेश जैन,उपाध्यक्ष ॲड सोनकुसरे,सचिव एड. निंबाळकर, एड. पिसे ,एड. खंगारे ,एड. पुरे, एड.काळे ,एड. मनपे ,एड. गोंधूळे एड.माधुरी चौधरी, एड. शेंडे, ॲड.गजभिये,ॲड वतेकर,ॲड.मानकर,ॲड वांद्रे, सह तालुका वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी सहकार्य केले.




