Home Breaking News शिवतीर्थ उमरीहून महासम्राट बळीराजा रथयात्रेचे औपचारिक प्रस्थान — भक्तिभाव आणि उत्साहात गुरुकुंज...

शिवतीर्थ उमरीहून महासम्राट बळीराजा रथयात्रेचे औपचारिक प्रस्थान — भक्तिभाव आणि उत्साहात गुरुकुंज मोझरी ते शिवतीर्थ उमरी यात्रा प्रारंभ

111
0

सावनेर
महासम्राट बळीराजा रथयात्रा दिनांक ११ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोझरी ते शिवतीर्थ उमरी या मार्गावर अत्यंत भक्तिभावाने आणि दणक्यात आयोजित करण्यात येत आहे. या पवित्र यात्रेच्या पूर्वतयारीचा शुभारंभ आज, दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी रथयात्रेचे प्रस्थान दुपारी १:३० वाजता उमरी (भ) येथील शिवतीर्थ टुरिझम कार्यालय परिसरातून करण्यात आले. या वेळी आयोजक समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात रथाची सुशोभिकृत मिरवणूक काढण्यात आली.
बळीराजा रथयात्रा ही श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. या यात्रेद्वारे समाजात एकात्मतेचा संदेश दिला जातो. रथयात्रेच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, सांस्कृतिक उपक्रम आणि समाजहितार्थ उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here