गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
भारतीय एअरटेल केबल मार्फत गेल्या चार महिन्यापूर्वी सावनेर (तिष्टी)मार्गे काटोल मुख्य रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाची रोड लगत काम केले असून तेलकामठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चौकीजवळ मुख्य रोडालगत माणूस भरायच्या वर अनेक जीव घेणे गड्डा असल्याचा दिसून येत आहे.हा गड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रोड लगत असल्याने अपघाताची दाट शक्यता असल्याचे दिसत आहे.
या विषयी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कळमेश्वर येथील उपअभियंता श्री.रुपेश बोदडे यांच्याकडे विचारले असता त्यांनी सांगितले की, मी संपूर्ण माहिती घेतली तो गड्डा भारतीय एअरटेल केबल मार्फत अवैधरित्या खदून ठेवला असून तो बुजवण्यास केबल कॉन्ट्रॅक्टर याला सांगितले तसेच याविषयी माहितीचे पत्र देऊन पोलीस स्टेशनला सुद्धा माहिती दिली आहे. तसेच त्या केबल कॉन्ट्रॅक्टर नी तो गड्डा न बुजवल्यास मी पोलीस स्टेशन येथे लवकरच एफ.आय.आर दाखल करणार असल्याचे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री.रुपेश बोदडे यांनी सांगितले आहे.