गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार तहसिल प्रशासनाने ही मोहीम तालुक्यात सुरू केली आहे.अद्यापही मृत व्यक्ती, विवाहानंतर दुसरीकडे स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांच्या तसेच इतरत्र गेलेल्या कुटुंबांच्या शिधापत्रिका सक्रिय अवस्थेत असल्याचे आढळले आहे. यामुळे अनेक अपात्र कुटुंबे धान्याचा लाभ घेत असून, खरे गरजू लाभार्थ्यांपासून हा अधिकार दूर राहतो. ही अन्यायकारक परिस्थिती दूर करण्यासाठी ई-केवायसी मोहीम राबवली जात आहे.
• ई-केवायसी कशी होणार ?
१)प्रक्रिया संपूर्णपणे नि:शुल्क आहे.
२)गावातील रास्त भाव दुकानात ई-पॉस मशीनद्वारेच ई-केवायसी केली जाईल.
३)प्रत्येक दुकानदाराने त्यांच्या दुकानाशी संलग्न असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंद करणे आवश्यक आहे.
तालुक्यातील नागरिकांना ई-केवायसीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास तालुका निरीक्षण अधिकारी मंगेश ढवळे यांच्याशी थेट संपर्क साधावा. तहसीलदार विकास बिक्कड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना या मोहिमेत तत्परतेने सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Home अन्न व पुरवठा कळमेश्वर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई-केवायसी मोहीम सुरू




