Home अन्न व पुरवठा प्रकाश निंबाळकर सलग पाचव्यांदा कळमेश्वर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या अध्यक्षपदी अविरोध...

प्रकाश निंबाळकर सलग पाचव्यांदा कळमेश्वर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड

109
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या बैठकीत प्रकाश निंबाळकर यांची सलग पाचव्यांदा तालुका अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तहसिल कार्यालयातील सभागृहात दुपारी २ वाजता झालेल्या या बैठकीस तालुक्यातील सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.
यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून मंजुषा भुजाडे, उपाध्यक्ष नंदकिशोर गोतमारे, सचिव बाबाराव दैने, सहसचिव मुकेश बोरकर आणि कोषाध्यक्ष सागर काळे यांची निवड करण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश निंबाळकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड होत असून यंदाही दुकानदार बांधवांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. दोन वर्षांपूर्वी काही सदस्यांकडून अध्यक्षपद नको अशी मागणी झाली होती, मात्र त्या वेळी देखील बहुमताने (३५ विरुद्ध ०२) निंबाळकर यांच्याच नेमणुकीला मान्यता देण्यात आली होती.स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नांसाठी लढा देणारा तडफदार नेता म्हणून निंबाळकर यांनी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दुकानदारांनी दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे अशा ठिकाणी झालेल्या राज्य व राष्ट्रीय आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. यंदाही मुंबईतील मंत्रालयात अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ व महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी नागपूर जिल्हा शिष्टमंडळात प्रतिनिधित्व केले होते.अध्यक्षपदी झालेल्या आपल्या अविरोध निवडीबद्दल बोलताना निंबाळकर यांनी दुकानदार बांधवांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना सोबत घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सध्या निंबाळकर हे कळमेश्वर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाचे अध्यक्ष असून, ते नागपूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघाचे महासचिवदेखील आहेत. त्यांच्या सलग निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here