Home Breaking News नगर परिषद मैदानात उत्साहात रावण दहन;आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते सोहळा...

नगर परिषद मैदानात उत्साहात रावण दहन;आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते सोहळा संपन्न

54
0

सावनेर
नगर परिषद मैदानात विजयादशमी निमित्त रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थित राहून सण साजरा केला. ५१ फूट उंच रावणाचे विधिवत दहन करण्यात आले, तर आकर्षक आतषबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमात आमदार डॉ. आशीष देशमुख यांचा आयोजकांनी भव्य सत्कार केला. सभेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की सावनेर–कलमेश्वर विधानसभेत कोट्यवधींच्या विकास योजनांची धारा सुरू असून, या क्षेत्राच्या नवनिर्माणासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी नमूद केले की, पूर्वी या भागात जंगलराज होते, परंतु आता जनतेला मंगलराजाचा अनुभव येत आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाबरोबरच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने पुढील वर्षी गांधी चौकात विदर्भातील सर्वात उंच तिरंगा फडकविण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. भगवान श्रीरामाने रावणाचा आणि देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळविल्याप्रमाणे समाजातील अंधकारही दूर व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, जिलाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी नगराध्यक्ष ॲड.अरविंद लोधी, डॉ. विजय धोटे, शहराध्यक्ष मंदार मंगले, तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. हलक्या पावसातही नागरिकांनी रावण दहनाचा आनंद घेत विजयादशमीचा सण उत्साहात साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here