Home Breaking News प्रगती दुर्गा उत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

प्रगती दुर्गा उत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

42
0

सावनेर
शहरात होळी चौक येथील प्रगती दुर्गा उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही,दुर्गा पूजा सोहळा,महाआरती,शोभायात्रा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.येथील दहा दिवसीय कार्यक्रमांचा महाप्रसादाने व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून समारोप करण्यात आला परिसरातील शेकडो भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला 
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा व इतर खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बच्चेकंपनी पासून तर आठवी नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here