पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत दिनांक २४/११/२०२५ चे रात्री ०९:३० ते २५/११/२०२५ पहाटे ०३:०० वाजेच्या दरम्यान मौजा जोगा (माळेगाव) येथुन ६ बकऱ्या चोरी गेल्या बाबत गुन्हा नोंद आहे आणि दिनांक २४/११/२०२५ चे दुपारी ०१:३५ वाजेच्या सुमारास मौजा रामपुरी येथुन २ बोकड चोरी गेल्या बाबत माहीती वरून पोलीस स्टेशन केळवद येथे कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहीता अन्वये वरील प्रमाणे बकरी चोरीचे २ गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
केळवद पोलीसांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करीत गुप्तबातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या अधारे अवघ्या २४ तसाच्या आत दिनांक २७/११/२०२५ रोजी आरोपी नामे १) मोहम्मद इम्तीयाज कुरेशी, रा. शांतीनगर नागपुर आणि २) मयुर मारोती ओमकार,रा. गौडखैरी, चौदामैल, ता. कळमेश्वर ह.मु नागपुर यांना नागपुर शहरातुन ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी नमुद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपीतांना अटक करून आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेले २ बोकड किंमती १०,०००/- रूपये, रोख रक्कम ३०,०००/- रूपये, दोन अॅड्रॉईड मोबाईल किंमती १०,०००/- आणि गुन्हयात बकरी चोरी करण्यासाठी वापरलेले चारचाकी हुंडाई Eon वाहन एम.एच ०२ सी.पी २०५९ किंमती ३००,०००/- रूपये, असा एकुण किंमती ३,५०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.




