Home राजकीय वैशाली घटेंचा अर्ज नव्हे… विरोधकांसाठी ‘राजकीय इशारा’ ! शहरात खळबळ—२ डिसेंबरला कोणाची...

वैशाली घटेंचा अर्ज नव्हे… विरोधकांसाठी ‘राजकीय इशारा’ ! शहरात खळबळ—२ डिसेंबरला कोणाची सत्ता ?

38
0

सावनेर नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी,वैशाली गोपाल घटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात मोठा हलचल निर्माण केला आहे. या निर्णयाने फक्त विरोधकच नव्हे, तर स्थानिक मतदारांमध्येही चर्चा सुरू केली आहे की, शहरातील राजकीय समीकरण आता पूर्वीसारखे राहणार नाहीत.
काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष गोपाल घटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ही पायरी या बदलाचा सुरवातीचा टप्पा होता. आता त्यांच्या पत्नी वैशाली घटेच्या उमेदवारीमुळे स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांचा लाभ कोण घेईल, हे पुढील मतदानात स्पष्ट होणार आहे.
सावनेरसारख्या शहरात अशी घडामोड केवळ निवडणूक जिवंत ठेवण्यापुरती नाही; ती मतदारांमध्ये राजकीय निर्णयांची गंभीर चर्चा निर्माण करण्याचे साधन ठरते. २ डिसेंबर रोजी मतदानानंतर शहरात कोणाची सत्ता उभी राहणार आहे, यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संपादकीय दृष्टिकोनातून पाहता,वैशाली घटे यांचे पाऊल फक्त राजकीय दांवपेच नाही,तर स्थानिक राजकारणातील बदलाच्या प्रक्रियेची सुस्पष्ट चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here