Home Breaking News मोहपा येथे नवीन उच्च प्राथमिक शाळाच्या इमारतीचे लोकार्पण महसूल मंत्री व नागपूर...

मोहपा येथे नवीन उच्च प्राथमिक शाळाच्या इमारतीचे लोकार्पण महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न

107
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
दिनांक ३१ मे २०२५ रोजी मोहपा (ता.कळमेश्वर,जि. नागपूर) येथे नवीन उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिषराव देशमुख हे होते. हा सोहळा शिक्षणाच्या विकासासाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता.
या भव्य कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर माजी आमदार श्री.अशोकजी मानकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोद्दार, श्री मनोहरराव कुंभारे (अध्यक्ष नागपूर ग्रामीण), श्री. आनंदराव राऊत( अध्यक्ष नागपूर ग्रामीण), श्री अशोकराव धोटे(माजी जि.प. अध्यक्ष), श्री. बापूसाहेब हळदे, श्री. आदर्श पटले, श्री. प्रमोदजी हत्ती, श्री. संदिपजी उपाध्य, सावनेर उपविभागीय अधिकारी श्री. संपतजी खलाटे, श्रीमती मकवाने मॅडम (तहसीलदार -कळमेश्वर), श्रीमती योगिता डांगरे, श्री. विलासजी गणोरकर (शहर अध्यक्ष मोहपा), श्री.किशोरजी रेवतकर यांचीही उपस्थिती लाभली.
ग्रामीण शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम शिक्षण देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व फार मोठं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here