Home सांस्कृतिक व सामाजिक कळमेश्वरमध्ये विविध शासकीय व राजकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कळमेश्वरमध्ये विविध शासकीय व राजकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

67
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार विकास बिक्कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार ज्योती जाधव,संदीप तडसे,संजय कांबळे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, डॉ. राजीव पोतदार तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालय, बाजार चौक झेंडा मैदान तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे नगराध्यक्ष अविनाश माकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष धनराज देवके, डॉ. राजीव पोतदार, मुख्याधिकारी आकाश सुरडकर, नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
पीएमश्री नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नगरसेवक मनोज शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका पौर्णिमा मेश्राम, उपमुख्याध्यापक दादाराव जांभुळकर, पर्यवेक्षक अरविंद राठोड व शिक्षक उपस्थित होते.
भाजप कार्यालयात नगराध्यक्ष अविनाश माकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजीव पोतदार, डॉ. वर्षा पोतदार, नगरपरिषद उपाध्यक्ष धनराज देवके, शहराध्यक्ष प्रतीक कोल्हे, महिला आघाडी अध्यक्ष मनीषा लंगडे, राकेश देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
कळमेश्वर नागरी पतसंस्थेत संचालक रविराज लंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, उपाध्यक्ष प्रकाश वरुळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनंदा लंगडे, संचालक, कर्मचारी व अभिकर्ते उपस्थित होते.
शिवसेना (उबाठा) कार्यालयात निखिल चांदुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मोरेश्वर रक्षक, मधुकर दळवी, माणिक चांदुरकर, अरविंद दहीकर, राहुल हिवराळे, इम्रान पठाण, विजय वाघधरे, विलास बारमासे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here