Home महाराष्ट्र महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन राज्याला न भरून निघणारी...

महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन राज्याला न भरून निघणारी हानी- डॉ.राजीव पोतदार

65
0

गिरीश आंदे
महाराष्ट्राचे लोकनेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर शोककळा पसरली आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन ठेवणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे.
गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले अजितदादा हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जात होते. राज्य विकासाच्या दिशेने मोठी झेप घेत असतानाच त्यांचे अचानक जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
एखादा नेता घडवण्यासाठी अनेक वर्ष लागतात.मात्र अशा प्रभावी नेतृत्वाचा अकाली अंत होणे हे राज्याच्या राजकीय व सामाजिक जीवनासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी भाजपाच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना विनम्र आदरांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here