गिरीश आंदे
सावनेर तालुक्यातील खुरजगाव येथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तीन दिवसीय शिवजयंती महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवातील प्रमुख प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. ॲड. गुजाजी बर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विनोद दादा मानकर (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, नागपूर) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “शिवविचारांची वर्तमानातील प्रासंगिकता आणि आजच्या तरुणांची कर्तव्ये” या विषयावर त्यांनी प्रभावी व्याख्यान देत युवकांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुरेश कडू होते. महोत्सवाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील लहान मुलांनी देशभक्तीपर गीते, नृत्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे वातावरण भारावून टाकले.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. तीन दिवस चाललेल्या या उत्सवामुळे खुरजगावात शिवभक्तीचा आणि सामाजिक प्रबोधनाचा जागर जागर अनुभव पाहायला मिळाला.
Home सांस्कृतिक व सामाजिक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खुरजगावात तीन दिवसीय महोत्सव जल्लोषात साजरा




