गिरीश आंदे
दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव मंदिर, छिंदवाडा रोड, सावनेर येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला तसेच नगरवासीयांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पक्षाचे अध्यक्ष गोपाल घटे, नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष प्रशांत ठाकरे, तालुका अध्यक्ष सुरेंद्र वानखेडे, सावनेर महिला अध्यक्ष शितल माटे,वैशाली गोपाल घटे,सुनीता गायकवाड़, आशीष माटे, मोहन कानफाडे, प्रा.विट्ठलराव कोल्हे,शेषराव वाडिकर, तुषार गायकवाड़,योगेश वाडबुदे,सोमेश्वर भुसारी,चंद्रशेखर कावडकर, किशोर कावडकर, भगवान रायकवाड, संजय खोदनकर, राजू वाघाडे,अमोल डाहाट यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्यात सक्रिय राहण्याचा संकल्प केला.
Home सांस्कृतिक व सामाजिक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सावनेर येथे...




