नाशिक
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने नववी सीनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथील सय्यद पिंपरी क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली
प्रथम क्रमांक हिंगोली ,द्वितीय क्रमांक नाशिक
तृतीय क्रमांक रत्नागिरी,यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी ,महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महिला अध्यक्ष धनश्री गिरी व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड ,रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव ,सिंधुदुर्ग जिल्हा सचिव कुणाल हळदणकर , मुंबई उपनगर संदिप पाटील हिंगोली जिल्हा सचिव मजर इत्यादी उपस्थित होते.
भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल व होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेबद्दल माहिती सांगितली या स्पर्धेत एकूण मुलांच्या 15 व मुलींच्या सात संघांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेच्या अंतिम सामना नाशिक विरुद्ध हिंगोली यामध्ये झाला हिंगोली संघाने उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर नाशिक संघाला उपविजयी पदावर समाधान मानावे लागले तृतीय क्रमांक रत्नागिरी व चतुर्थ क्रमांक रत्नागिरी सिटी तसेच मुलींचा अंतिम सामना सांगली विरुद्ध रायगड यामध्ये झाला सांगली संघाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळवला तर रायगड संघाला उपविजयी पदावर समाधान मानावे लागले.
तृतीय क्रमांक नाशिक संघाला मिळाला या स्पर्धेत
मालिकावीर – शेख जमीर शब्बीर (हिंगोली)
सर्वोत्कृष्ट फलंदाज – शेख जमीर शब्बीर (हिंगोली)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज – मुन्ना पंडित (नाशिक)यांनी मिळवल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष कन्हैया गुजर व महासचिव मीनाक्षी गिरी , महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी , महिला अध्यक्ष धनश्री गिरी,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केले.
सदर स्पर्धेत संदीप पाटील, धनंजय लोखंडे,सोमा बिरादार, दर्शन थोरात, मानस पाटील, हर्षवर्धन चौधरी, देवेंद्र बागुल, सत्यम पांडे, धनश्री गिरी, साक्षी गणे, रूतुजा तोरडमल, रोहिणी सकटे,यांनी पंच म्हणून काम पार पाडले.
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे होत आहे या स्पर्धेत महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई संघ सहभागी होणार आहे.
Home Breaking News सिनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत हिंगोली संघाला प्रथम पारितोषिक




