तालुका प्रतिनिधी हिंगणा
दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी भगवान श्री खाटू श्यामजी यांच्या जयंतीनिमित्त पूजन व वाढदिवस सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडला. हा कार्यक्रम शिवसेना विधानसभा अध्यक्ष मा. नरेशजी देवगडे यांच्या हस्ते सायंकाळी शिवालय, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वानाडोंगरी येथे संपन्न झाला.
या प्रसंगी शिवसेना हिंगणा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील प्रतिष्ठित पत्रकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गजानन धाकूलकर, पत्रकार सागर पडोळे तसेच ज्येष्ठ समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगळे गुरुजी (वानाडोंगरी) यांचा सत्कार समारंभही करण्यात आला.
कार्यक्रमाला खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली —
मा. नरेशजी देवगडे, विधानसभा अध्यक्ष हिंगणा
राजेंद्र गिरडकर, तालुका प्रमुख हिंगणा
गुणवंतजी तपासे
नरेंद्र हटेले, शहर प्रमुख डिगडोह
वासुदेव चरडे, शहर प्रमुख हिंगणा
अभिजीत करडे, शहर प्रमुख निलडोह
पराग मुरकुटे, शहर प्रमुख वानाडोंगरी
गजुजी वाघ, शहर सचिव वानाडोंगरी
स्मितील आदमने, विभाग प्रमुख कानोलीबारा
आकाश वाल्मीक, उपशहर प्रमुख डिगडोह
विक्रांत चाफले
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापन शिवसेना हिंगणा तालुका पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडले. या पूजन सोहळ्याने परिसरात धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले.




