Home Breaking News कळमेश्वर तालुक्यात आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते ₹४.५१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन...

कळमेश्वर तालुक्यात आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते ₹४.५१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

68
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी, धापेवाडा आणि गोंडखैरी या गावांमध्ये आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे उत्साहात पार पडले. एकूण सुमारे ₹४ कोटी ५१ लाखांच्या विकासकामांमुळे या परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांना आधुनिक सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे.
तेलकामठी येथे ₹१ कोटी ८३ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांत आरोग्य उपकेंद्र, समाजभवन, रस्ते, पाणीपुरवठा, नाली बांधकाम तसेच गाव सौंदर्यीकरण व सार्वजनिक सुविधा यांचा समावेश आहे. या कामांमुळे गावातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे.
धापेवाडा गावात ₹२ कोटी २० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये स्थानिक नदीचे खोलीकरण, निरुपयोगी बंधारा तोडण्याचे काम, कोलबा स्वामी देवस्थान परिसर विकास, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम तसेच धापेवाडा ते गुरुद्वारा रस्ता बांधकाम (ग्रामा १०४) या प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व कामांमुळे धापेवाडा परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
गोंडखैरी गावात ₹४८ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यात ग्रामसचिवालयाचे विस्तारीकरण, वार्ड क्रमांक १ ते ५ मध्ये सिमेंट रस्ता बांधकाम आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळा गोंडखैरी जुनी येथे वर्गखोली बांधकाम (DPDC आणि समग्र शिक्षा योजनेअंतर्गत) अशा प्रकल्पांचा समावेश आहे.
या भव्य सोहळ्यांना डॉ. राजीव पोतदार (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), मनोहर कुंभारे (भाजपा जिल्हाध्यक्ष, काटोल) तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्व विकासकामांच्या माध्यमातून कळमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here