सध्या पावसाळा सुरू आहे. याच दिवसांत जनावरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना आरोग्य, रोगनिदाना यावर युट्यूब लाईव्ह प्रोग्रॅमच्या माध्यमातून दिनांक २४ जून २०२५ रोजी पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
रिलायन्स माहिती सेवा उपक्रम अंतर्गत डिजिटल टूलच्या माध्यमातून हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामधून पशुपालक या कार्यक्रमामध्ये जुडले गेलेले होते. पशुपालकांना डॉ. अनिल भिकाने सर, संचालक विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर, डॉ. सुनील वाघमारे सर पारध्यापक पशुवैद्यकीय आणि पशु विज्ञान महाविद्यालय अकोला, डॉ. महेशकुमार इंगवले सर पारध्यापक पशुवैद्यकीय आणि पशु विज्ञान महाविद्यालय अकोला, डॉ. रंजीत इंगोले पारध्यापक पशुवैद्यकीय आणि पशु विज्ञान महाविद्यालय अकोला यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पावसाळ्याच्या सुरूवातीला पशुपालकांनी आपल्या पशूंची कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच त्यांना कोणता खुराक द्यावा, कोणत्या लसी द्याव्या आणि कोणते उपाय करावे तसेच गोठा व्यवस्थापन आणि स्वच्छता यावर तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर पशुपालकांनी त्याच्या पशूंच्या बाबतीत ज्या समस्या होत्या त्या तज्ञांना सरळ प्रश्न विचारून त्या प्रश्नांचे समाधान मिळवले.
Home Breaking News महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर व रिलायन्स फाऊंडेशन यांचा उपक्रम




