Home Breaking News राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट वार्षिक सहविचार सभा उत्साहात

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट वार्षिक सहविचार सभा उत्साहात

33
0

नाशिक
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि सातारा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक सहविचार सभा क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड सातारा येथे उत्साहात पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट क्रिकेटच्या सचिव मीनाक्षी गिरी या होत्या. या प्रसंगी श्री विश्वंभर बाबर सौ.सुलोचना बाबर महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महिला राज्य डायरेक्टर धनश्री गिरी , महाराष्ट्र सहसचि व सातारा जिल्हा सचिव चंद्रकांत तोरणे, विलास गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
या वार्षिक सहविचार सभेमध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी यांनी सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेटबद्दल माहिती व नवीन नियमांबद्दल व वार्षिक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे नियोजन सांगितले.
या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य अंतर्गत विभाग प्रमुख यांची निवड करण्यात आली.
त्यामध्ये नाशिक विभाग प्रमुख अध्यक्ष विलास गायकवाड सचिव संदिप शिंदे
(पुणे विभाग),
प्रमुख अध्यक्ष
सचिव ..
मुंबई विभाग प्रमुख अध्यक्ष महेश मिश्रा, सचिव संदीप पाटील,छत्रपती संभाजीनगर विभाग
प्रमुख अध्यक्ष मुजीब शेख,
सचिव शेख शफी,अमरावती विभाग प्रमुख अध्यक्ष नितीन श्रॉफ
सचिव , गोवर्धन राठोड,
कोल्हापूर विभाग अध्यक्ष. विजय बिराजदार
सचिव कुणाल हळदणकर , लातूर विभाग
अध्यक्ष आदित्य पाटील, पुणे विभाग अध्यक्ष रामा रणदिवे
सचिव ज्ञानेश्वर जाधव यांची निवड करण्यात आली.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपापल्या विभागामध्ये टेनिस क्रिकेटचा प्रचार करावा तसेच त्यांची विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेटचे फाउंडर कन्हैया गुजर, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र असोसिएशनच्या अध्यक्ष मयुरी गिरी, महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी, विलास गिरी, धनुजय लोखंडे,यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here