गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक १०/१२/२०२५ रोजी कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा गौडखैरी येथे काही इसम लोकांकडुन पैसे घेवुन सट्टापट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचत असतांना पोलीसांची चाहुल लागताच लागताच तेथील आरोपी पळुन गेले. सदर मुख्य आरोपी चे नाव सलीम ईकबाल कुरैशी, वय ३० वर्ष, रा गौडखैरी तह. कळमेश्वर असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली. पोलीसांनी घटनास्थळीची पंचासमक्ष पाहणी करून घटनास्थळावरून १) नगदी ३३७०/-रूपये २) हिरो स्प्लेंडर एम एच ४० बि एम ५३६७ किंमती ३०,०००/- रूपये ३) होंडा पॅशन एम एच ४० झेड ८५२२ किंमती २०,०००/- रूपये ४) सट्टापट्टी साहीत्य आणि इतर साहित्य असा एकुण ५३,९८०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नमुद आरोपी कं १) सलीम ईकबाल कुरैशी, वय ३० वर्ष, रा गौडखैरी तह. कळमेश्वर आणि त्याचे साथीदार यांच्या विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




