Home सामाजिक विद्यार्थिनींच्या सोयीकरिता रामटेक आगाराची त्वरित कारवाई – उद्यापासून संध्याकाळी ५ ते ५.३०...

विद्यार्थिनींच्या सोयीकरिता रामटेक आगाराची त्वरित कारवाई – उद्यापासून संध्याकाळी ५ ते ५.३० बस,आष्टीत थांबा सुरू

59
0

मौदा (तालुका प्रतिनिधी)
मौदा-रामटेक रोडवरील नवेगांव, आष्टी, चाचेर, नेरला व नंदापुरी या गावांतील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना संध्याकाळी घरी परतण्यासाठी बस नसल्याने मोठ्या अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांनी शुक्रवार दि. १२ डिसेंबर रोजी रामटेक एसटी आगाराचे आगार प्रमुख तथा व्यवस्थापक भगत यांची भेट घेतली. बरबटे यांनी संध्याकाळी ५.०० ते ५.३० या वेळेत बस उपलब्ध करावी व आष्टी गावात बस थांबा सुरू करावा, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी वाहतूक नियंत्रक युवराज बलगोटे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक सौ. रुपाली शेमसक्कर, येसंबा सरपंच धनराज हरोडे, गांगनेर हिवरा उपसरपंच मोतीराम घरजाळे, माजी उपसरपंच नंदू मेहर व सामाजिक कार्यकर्ते अजय वाघमारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here