गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव येथील आदर्श मैदानावर आज दिनांक ६ फेब्रुवारी पासून ९ फेब्रुवारीपर्यंत भव्य शंकरपट व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार आशिष देशमुख राहणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी आमदार चरणसिंग ठाकुर, आमदार समीर मेघे, माजी आमदार सुधाकर कोहळे, भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, आनंदराव राऊत व डॉ. राजीव पोतदार उपस्थित राहणार आहेत.
या चार दिवसीय कार्यक्रमात शंकरपट, कृषी प्रदर्शनी, आरोग्य तपासणी शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




