Home Breaking News तहसील कार्यालय कळमेश्वर येथे ४ ऑगस्टला पीककर्ज वाटप शिबिर – तहसीलदार विकास...

तहसील कार्यालय कळमेश्वर येथे ४ ऑगस्टला पीककर्ज वाटप शिबिर – तहसीलदार विकास बिक्कड

128
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीककर्ज वाटपासंदर्भात सोमवारी दिनांक ४ ऑगस्ट २०२५ तहसील कार्यालय येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तालुक्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी पीककर्जासंदर्भात आवश्यक कागदपत्रांसह शिबिरस्थळी उपस्थित राहून पीककर्ज शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here