Home Breaking News श्रेविक कंपनी चे मालक विपिन काकडे यांच्या नव मानव कल्याण बहुउद्देशीय सेवा...

श्रेविक कंपनी चे मालक विपिन काकडे यांच्या नव मानव कल्याण बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्षाकडून सत्कार

42
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
नव मानव कल्याण बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष व सेवानिवृत्त पोलीस श्री रमेश कनेरे यांनी श्रेविक कंपनी रामचंदन लेआउट एमआयडीसी येथे भेट दिली असता सदर व कंपनीचे मालक श्री विपिन जी काकडे यांनी प्रथम कर्मचाऱ्यांसोबत शिवाजी महाराजांची लाकडी प्रतिमा देऊन स्वागत केले विचार विनिमय दरम्यान श्री विपिन जी हे एक चांगले मानव असून त्यांनी त्यांच्या या कंपनीमध्ये काम करून त्यांना मार्ग दाखवणारा श्री पांडुरंग सातपुते यांना त्यांच्या परिवारांनी न ठेवल्याने रोडवर देखील राहिले अशातच बिपीनजी यांनी त्यांच्याच कंपनीतील मॅनेजर पदावर कार्यरत असलेले श्री चंद्रशेखर पाटणकर यांच्या मदतीने त्यांना लिव्हरचा त्रास असल्याने शालिनीताई मेघे हॉस्पिटल वाना डोंगरी येथे भरती केले कंपनीच्या मालक या नात्याने एका गरिबाला वैद्यकीय मदत करत असल्याने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो व यापुढे त्यांनी असेच कार्य करत राहावे ही अपेक्षा ठेवतो.
सदर प्रसंगी कंपनीतील वर्कर्स यांना मार्गदर्शन केले व त्यांना प्रामाणिकपणे काम करून मालकाला सहकार्य करावे काही अडीअडचणी आल्यास आम्हास कळवा आम्ही मदत करू व शासना कडून देखील मदत करून घेऊ असे कळवून मदतीचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री चंद्रशेखर पाटणकर यांनी केले व या छोट्याशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here