Home सांस्कृतिक व सामाजिक सावनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)...

सावनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष गोपाल घटे यांच्या हस्ते पुतळ्याला माल्यार्पण

45
0

गिरीश आंदे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सावनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सावनेर शहराध्यक्ष गोपाल घटे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष बाबा झाडे, तालुका अध्यक्ष सुरेंद्र वानखडे, महिला विधानसभा अध्यक्ष यामिनी मंडपे, युवा विधानसभा अध्यक्ष तुषार गायकवाड, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष महेश बोंदरे, शहर सचिव भगवान रायकवाड यांच्यासह सुनिता गायकवाड, सचिन मडके, शांताराम अंतुरकर, शेषरावजी वाडीकर, योगेश्वर वाडबूधे, रोशन वानखडे, सुरेश वानखडे, राजू वाघाडे, मोहन कानफाडे, नामदेव राऊत, चंद्रशेखर कावडकर, अमोल डहाट, रामकृष्ण मानकर, भोजराज घटे, चंद्रभान रहाटे, गणपती पठाणे, योगेश शर्मा, दिलावर शेख, आर्यन कातकडे, कापसे काका तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here