गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मिळालेल्या प्रचंड बहुमताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व जेडीयूचे नेते नितीश कुमार यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. या निकालाद्वारे काँग्रेसने सातत्याने जाती-धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा केलेला प्रयत्न मतदारांनी ठामपणे नाकारला असल्याची प्रतिक्रिया भाजप व एनडीए समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसने देशभरात “मतचोरी”चा आरोप करत इलेक्शन कमिशनवर उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही बिहारच्या जनतेने या निकालातून ठोस उत्तर दिले असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.
बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी “डबल इंजिन सरकार” आणखी वेगाने काम करेल आणि राज्याची प्रगती आगामी काळात अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
डॉ.राजीव पोतदार यांनीही एनडीए,भाजप व जेडीयूचे मनःपूर्वक अभिनंदन करत राज्याच्या उज्ज्वल भविष्याची आशा व्यक्त केली.




