Home Breaking News सावनेर विधानसभा क्षेत्रातील कामगार नेते विजय बसवार यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्ष...

सावनेर विधानसभा क्षेत्रातील कामगार नेते विजय बसवार यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

73
0

सावनेर विधानसभा क्षेत्रातील कामगार नेते विजय बसवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह सोमवारी दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी कृपाल तुमाने यांचे कार्यालयात जाऊन शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार अंगिकारून तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पक्षाला अधिकाधिक मजबूत करण्याचा निश्चय त्यांनी केला. सर्वसामान्यांसह कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शिवसेना व शिवसेनेचे कार्यकर्ते प्रतिबद्ध आहेत.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विनोद सातंगे, युवासेना पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले, युवा सेना जिल्हा प्रमुख अभय राऊत, शहर संघटक अमित कातुरे, यादवराव मिरचे, अनिल भागवत, संजय गहुकर, अनिल वानखेडे, कैलास चव्हारे, पंकज आखरे, रोशन काळे यांच्यासह अनेक कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here