Home सामाजिक आज”शिवतीर्थ” टुरिझम येथे जिजाऊ व शिवबाच्या पुतळ्याचे अनावरण

आज”शिवतीर्थ” टुरिझम येथे जिजाऊ व शिवबाच्या पुतळ्याचे अनावरण

104
0

सावनेर
आज दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी मराठा सेवा संघ द्वारा आयोजित राज्यस्तरीय जिजाऊ रथयात्रा आज सावनेर तालुक्यातून जात असताना अनेक ठिकाणी जिजाऊ रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले तर ऊमरी गावातील शिवतीर्थ टुरिझम येथे जिजाऊ व शिवबाच्या पुतळ्याचे अनावरण सुद्धा जिजाऊ रथ यात्रेची औचित्य साधून मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आले.जिजाऊ व शिवबा च्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शिवतीर्थ टुरिझम येथेच दुपारचे जेवणाची व्यवस्था शिवतीर्थ टुरिझम चे संस्थापक डॉ.अभीविलास नखाते यांच्याकडून करण्यात आली होती.
यावेळी सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड व जय शिवाजी सामाजिक संघटना तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here