मौदा (तालुका प्रतिनिधी) : –
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे दि. १३ व १४ एप्रिल रोजी या दोन दिवशीय अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष ॲड. नारायणभाई शहा यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे यांच्या पारदर्शक, प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेऊन पुढील तीन वर्षांसाठी पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री पदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. नारायण भाई शहा यांच्यासह विदर्भ प्रांताच्या वतीने प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, महिला प्रमुख डॉ. शोभा गायकवाड, ॲड. स्मिता बुल, अनिल मिश्रा व प्रसिध्दी प्रमुख तुकाराम लुटे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
प्रिय नितीनजी, विदर्भातील सर्व जिल्ह्यात संघटन विस्तारासाठी, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, अविरत केलेला प्रवास आणि अत्यंत निष्ठा पूर्वक केलेल्या कामाची पावती म्हणजेच आपल्यावर आलेली ही पाश्चिम क्षेत्र संघटन मंत्री पदाची जबाबदारी! आपल्या नेतृत्वाखाली विदर्भासह चारही प्रांतात सर्व समादेशक संघटन विस्तार होईलच असा विश्वास आहे. नवीन संघटनात्मक पदासाठी आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
– डॉ. नारायण मेहरे, अध्यक्ष, विदर्भ प्रांत
Home सामाजिक नितीन काकडे यांची पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री पदी नियुक्त अ.भा. ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय...




