Home Breaking News संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा अजय वाटकर यांची निवड

संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा अजय वाटकर यांची निवड

77
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्षपदी अजय वाटकर यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली असून संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या माध्यमातून कोणताही गरजू नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही.यासाठी मी नेहमी कटिबंध राहील असे वाटकर यांनी सांगितले आहे. अजय वाटकर यांचा सामाजिक कार्याचा मोठा अनुभव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब,गरजू आणि निराधार व्यक्तींसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
तसेच या समितीत सदस्य म्हणून मंगेश चोरे,प्रीती कोठाडे, विलास गणोरकर,अमोल भुरे, सतीश चालखोर,दिलीप तायवाडे, राजू वन्हाडे,देवीदास भगत यांची सुद्धा निवड करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here