गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळमेश्वरमध्ये मोठी राजकीय खडबड उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष ब्रिजलाल रघुवंशी यांनी पक्षाने तिकीट नाकारले तरी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहण्याची घोषणा केली आहे.
रघुवंशी म्हणाले, “मी काही नवसाचा नवरदेव नाही की पक्षाच्या भरोशावर लढेन. गेल्या तीन वर्षांपासून जनतेसाठी लढतो आहे आणि आता पुन्हा त्याच जोमात मैदानात उतरणार आहे. माझं कर्तृत्व आणि माझं कामच माझी ओळख आहे,” असे ते म्हणाले.
या घोषणेमुळे कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषदेच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. रघुवंशींच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक समीकरणात मोठा बदल घडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रघुवंशींना चांगला जनाधार असल्याने निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता जनता मतदानातून कोणावर विश्वास ठेवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Home Breaking News कळमेश्वरमध्ये राजकीय खडबड! ब्रिजलाल रघुवंशींची पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष उमेदवारीची घोषणा




