गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
संघटन पर्व २०२५ अंतर्गत नागपूर जिल्हा ग्रामीण चे संघटनात्मक रित्या २ जिल्हे करण्याचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टीने घेतला असून नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल) मध्ये काटोल, सावनेर, हिंगणा या विधानसभेचा समावेश आहे. जिल्हा कार्यकारणीच्या घोषणेपूर्वी लोकतांत्रिक पद्धतीने पार्टीचे सदस्यता अभियान, सक्रीय सदस्य अभियान, बूथसमितीचे गठन तसेच या जिल्ह्यात येणाऱ्या १६ मंडळ अध्याक्ष्यांची निवड व त्यांची कार्यकारणी पूर्णपणे गठीत करण्यात आली. त्यानंतर प्रदेश भाजपाने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा केल्या नंतर श्री. मनोहरजी शंकरराव कुंभारे यांची निवड जिल्हा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल) म्हणून केली होती.
मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब, मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मा.ना.श्री.रवींद्रजी चव्हाण यांच्या निर्देशानुसार तसेच आ.श्री. आशिषजी देशमुख, आ.श्री. समीरजी मेघे, आ.श्री. चरणसिंग ठाकूर, मा.श्री.राजीवजी पोतदार, मा.श्री. सुधाकरजी कोहळे, मा.श्री. अरविंदजी गजभिये यांच्या सहकार्याने जिल्हा अध्यक्ष मा.श्री. मनोहरजी कुंभारे यांनी कार्यकारणी मध्ये तरुणांना तसेच सर्व भागांना व सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने समतोल साधत नवीन जंबो जिल्हा कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.
जिल्हा अध्यक्ष – मनोहर कुंभारे
जिल्हा महामंत्री आदर्श पटले, दिनेश ठाकरे, नीलिमाताई रेवतकर, सुरेंद्र शेंडे
जिल्हा उपाध्यक्ष – रामराव मोवाडे, उकेश चव्हाण, मनोज कोरडे, धनराज देवके, किशोर चौधरी, चंद्रशेखर चिखले,
देविदास कठाणे, विशाल भोसले, विकास दाभेकर, लक्ष्मी जोशी, सरिता यादव, आयुश्री धपके.
कोषाध्यक्ष पितांबर इखार
जिल्हा मुख्यालय प्रभारी – इमेश्वर यावलकर
जिल्हा मंत्री अनिल ठाकरे, संदीप उपाध्याय, एकनाथ (बंडू) दुधे, विजय महाजन, दिलेश ठाकरे, रोहित मुसळे,
दिनेश कोचे, सौरभ गुप्ता, सनी चौहान, सीमा गुडधे
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुलभूषण (सोनू) नवधींगेगे
विविध आघाडी अध्यक्ष महामंत्री-
महिला मोर्चा अध्यक्ष-उज्वला बोढारे, महामंत्री-मंजुश्री ठाकरे, मीनाक्षी सरोदे, प्रगती मंडल.
युवामोर्चा अध्यक्ष-पियुष बुरडे. महामंत्री अनिकेत अंतुरकर, इशांत राऊत, मंदार वानखेडे.
अनु, जाती अध्यक्ष – सुजित नितनवरे महामंत्री-सिद्धार्थ धोके, राहुल वाहाणे, मारोती सोमकुवर.
अनु. जमाती अध्यक्ष – प्रशांत मडावी. महामंत्री- गोपाल खंडाते, रमेश ढोक, शंकर कुमरे.
अल्पसंख्यांक अध्यक्ष – अयुब पठाण महामंत्री-समीर पठाण, शफी शेख, कुंदनसिंग भादा.
किसान मोर्चा अध्यक्ष- विलास ठाकरे महामंत्री-संजय जीवतोडे, दिनेश चाफले, प्रमोद डाखळे.
ओ.बी.सी.अध्यक्ष- दिलीप माथनकर महामंत्री-विलास महले, प्रमोद गमे, दिलीप तांदळे.
सदर जिल्हा कार्यकारणी मध्ये कार्यकारणी सदस्य निमंत्रित सदस्य विशेष निमंत्रित सदस्य, कायम निमंत्रित सदस्य यांच्या सह विविध सेल व प्रकोष्ठ यांचे संयोजक व सह संयोजक व इतर पदाधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती मनोहर जी कुंभारे जिल्हाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल) यांनी दिली आहे.




