गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय जनता पक्षाची नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल) च्या नवनियुक्त कार्यकारणी मध्ये पक्षाकडून व पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आलेल्या आजपर्यंतच्या जबाबदारीबद्दल श्री.इमेश्वर यावलकर (जिल्हा मुख्यालय प्रभारी),श्री.संदीप उपाध्याय (जिल्हा मंत्री),श्री.प्रशांत मडावी (अनु.जमाती अध्यक्ष), श्री.संजय जीवतोडे (किसान मोर्चा महामंत्री) यांनी मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब, मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मा.ना.श्री.रवींद्रजी चव्हाण,आ.श्री. आशिषजी देशमुख, आ.श्री. समीरजी मेघे, आ.श्री. चरणसिंग ठाकूर, मा.श्री.राजीवजी पोतदार, मा.श्री. सुधाकरजी कोहळे, मा.श्री. अरविंदजी गजभिये,जिल्हा अध्यक्ष मा.श्री. मनोहरजी कुंभारे यांचे व पक्षाचे आभार व्यक्त केले आहे.
तसेच जिल्हा कार्यकारणी मध्ये आम्हा तरुणांना तसेच सर्व भागातील व सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने समतोल साधत नवीन जिल्हा कार्यकारणी मध्ये आम्हाला संधी देण्यात आली असल्याचे श्री.इमेश्वर यावलकर, श्री.संदीप उपाध्याय, श्री. प्रशांत मडावी,श्री. संजय जीवतोडे यांनी म्हटले आहेत.
Home Breaking News भारतीय जनता पक्षाची नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल) ची नवनियुक्त कार्यकारणी घोषीत होताच...




